दीपक केसरकर मित्रमंडळाचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गोरगरिबांना तसेच मच्छीमार, कातकरी, गवळी, धनगर व मागासवर्गीय वसाहतीतील सर्वांना गणेश चतुर्थीसाठी गणेशाच्या पुजनास लागणारे पूजा साहित्य व गोड पदार्थ बनविण्यासाठीचे साहित्य आणि शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे वाटप गणेश चतुर्थी सणापुर्वी पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते युद्ध पातळीवर पुर्ण केले. तालुक्यातील प्रत्येक गावात हे साहित्य वाटप व शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे वाटप ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय व मागासवर्गीय, मच्छीमार, कातकरी, धनगर, गवळी समाज वसाहती या ठिकाणी साहित्य वाटपाची वार व वेळ याची निश्चिती करुन तशी माहिती शिवसेना कार्यकर्त्यांमार्फत देवून केलेल्या अचूक नियोजनामुळे यावर्षी प्रथमच गणेशाचे पुजन करणाऱ्या कुटुंबास गणेश पुजन साहित्य मिळाले. या साहित्यापासून सर्वसामान्य चुकून राहू नये. यासाठी या गावातील सर्वसामान्य नागरिकांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने दिपक केसरकर मित्रमंडळाने गणेश चतुर्थी सण हा या भागातील सर्वात मोठा व उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. या सणासाठी सर्वसामान्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या तसेच मच्छीमार, मागासवर्गीय, कातकरी, धनगर, गवळी वसाहत असलेल्या भागातील जनतेला गणेश पूजनासहित गौडपदार्थ बनविण्याचे साहित्य असलेल्या पिशव्यांचे व शासनाच्या आनंदाचा शिद्याचे वाटप रेशनकार्ड माध्यमातून कार्यक्रम दिपक केसरकर मित्रमंडळाने शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर व वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी याचे अचूक नियोजन तसेच वाटप प्रसंगी प्रत्यक्ष सहभाग घेऊन केले.
सदर उपक्रम गणेश चतुर्थी सणापुर्वी पुर्ण होण्यासाठी तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिलेल्या जबाबदारी नुसार उप जिल्हा प्रमुख सचिन देसाई, सुनिल मोरजकर, तालुका समन्वयक बाळा दळवी, शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम, युवा सेना शहर प्रमुख संतोष परब, मच्छीमार तालुका सेल प्रमुख गणपत केळुसकर, प्रकाश मोठे, कौशिक परब, उपतालुकाप्रमुख, दिलीप मठकर, राजन गावडे, दत्तगुरु परब, दाय मांजरेकर, शिरोडा विभाग प्रमुख अमित गावडे, सुधीर धुरी, बाळू सावंत, बाबु रगजी, नंदकुमार झाटये,आरवली उपसरपंच किरण पालयेकर, भोगवे माजी सरपंच महेश सामंत,तुळस विभाग प्रमुख संजय परब, सुनील तुळसकर, रवी केळूसकर, देवा कांबळी, जगदीश परब, वासुदेव कोंडये, अण्णा वजराटकर, सुरेंद्र वारंग, पाल उपसरपंच प्रिती गावडे, कोचरा सरपंच योगेश तेली, भोगवे सरपंच श्री वायंगणकर, आडेली सरपंच यशस्वी कोंडस्कर, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव, पेंडूर सरपंच गीतांजली गावडे, मातोंड सरपंच जान्हवी परब, दाभोली माजी उपसरपंच एकनाथ राऊळ, माजी सदस्य व आडेली जि.प. विभाग प्रमुख नरेश बोवलेकर यासह अन्य पदाधिकारी यांनी तालुक्यात ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय व मागास वसाहतीच्या ठिकाणी गणेश पुजा साहित्य व शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे रेशन कार्डच्या माध्यमातून वाटपाचे नियोजन गावागावातील कार्यकर्त्यांच्या सहभागातून केलेले होते त्यानुसार युद्ध पातळीवर त्याचे वाटप केले.
दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदार संघातील वेंगुर्ले तालुक्यात, दीपक केसरकर मित्रमंडळामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दिपक केसरकर यांचेकडून गणेश चतुर्थी सणाच्या शुभेच्छा असलेल्या भगव्या रंगाच्या गणेश पुजा साहित्याच्या पिशव्यासह दिपक केसरकर हे घरोघरी पोहोचले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील गणेश भक्तांकडून दिपक केसरकर यांचे आभार व्यक्त होत असल्याचे केसरकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.