आंबोली | प्रतिनिधी
भाजपा ,शिवसेना ,राष्ट्रवादी महायुतीचे सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा चौकुळ गावात शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेचे युवा नेते दिनेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने चौकुळ गावात मंत्री दीपक केसरकर यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू असून संपूर्ण गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रचारादरम्यान दीपक केसरकर यांच्या या उमेदवारीचे चौकुळ वासियांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून मंत्री दीपक केसरकर यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवण्यास जनता इच्छुक असल्याचे दिनेश गावडे यांनी सांगितले. यापूर्वीही चौकुळवासियांनी मंत्री दीपक केसरकर यांना साथ दिली असून या निवडणुकीत चौकुळ गावातून भरघोस मतदान दीपक केसरकर यांना होणार असल्याचे दिनेश गावडे यांनी सांगितले. या प्रचार आघाडीत चौकुळ गावातील शक्ती केंद्रप्रमुख पांडूरंग गावडे, शाखाप्रमुख अभिजीत मेस्त्री, जाण भगत शशिकांत गावडे, चौकुळ सरपंच सुरेश शेटवे, नंदू गावडे, बबन रेडकर, समीर गावडे, सोनू धोंडू गावडे, विठ्ठल गणपत गावडे, भिकाजी आप्पा गावडे, वासुदेव रामा गावडे आदींसह शिवसैनिक सहभागी झाले आहेत.
Previous Articleप्रचार करण्यास महाडिकांना बंदी घाला
Next Article जपानमध्ये लाकडी उपग्रहाची निर्मिती









