Shivaji University : छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यापाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsinh Koshyari ) यांना शिवाजी विद्यापीठातील (Shiveji University) दीक्षांत सभारंभाला (Convocation) आमंत्रित करू नका. बहुजनांच्या विद्यापीठत जातीय वाद्याना थारा देऊ नका, अशी मागणी करत आज ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेतली. राज्यपाल कोल्हापुरात आल्यास त्यांना विरोध करून जेलभरो आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत राज्यपालांना रोखा, अन्यथा गेटसमोर निदर्शने करू, असा इशारा दिला. तसेच विद्यार्थ्यांना देखील दीक्षांत सभारंभावर बहिष्कार टाकण्याचे सांगू, असा इशारा यावेळी दिला.
Previous Articleकनेडी राड्याप्रकरणी 10 जणांना अटक
Next Article तपास अधिकाऱ्यांना मारहाण करून पळालेला आरोपी जेरबंद









