बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर अमित शहांची टीका : काँग्रेससह विरोधी पक्षांच्या एकजुटीवरही निशाणा
वृत्तसंस्था /लखीसराय
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात राबविलेल्या विकास योजना आणि सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या भाजपचे नेते विविध देशांमध्ये जाहीर प्रचारसभा घेत आहेत. याच निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुऊवारी बिहारमध्ये पोहोचले. मुंगेर लोकसभा मतदारसंघातील लखीसराय येथे त्यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिहारचा दौरा करत लखीसराय येथे जाहीर सभा घेतली. याप्रसंगी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ‘पल्टू बाबू’ म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इंदिरा गांधींच्या विरोधात राजकारण सुरू करून लालू यादव यांच्या विरोधात चमकणारे नितीश बाबू पुन्हा काँग्रेस आणि राजदमध्ये सामील झाले आहेत, असे ते म्हणाले. तसेच विरोधी एकजुटीवरही त्यांनी निशाणा साधला. पाटण्यात 15-20 पक्षांचे नेते एकत्र आले. या सर्व नेतेमंडळींनी 2014 पर्यंत 20 लाख कोटी ऊपयांचा घोटाळा केला होता. एवढा मोठा घोटाळा करणाऱ्यांना सोबत घेऊन नितीश सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार ही जयप्रकाश नारायण यांची भूमी आहे पण नितीशकुमार सत्तेसाठी सर्व तत्त्वे सोडून देत आहेत. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? असा प्रश्नही त्यांनी भरसभेत उपस्थित केला.
काँग्र्रेस, राहुल गांधीही लक्ष्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवरही टीका करण्याची संधी सोडली नाही. गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेस राहुल बाबूंना लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपयश येत आहे. मोदी सरकारने मात्र देशाचा विकास साधण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचा नावलौकिक वाढवल्याचे सांगितले. तसेच त्यांनी 9 वर्षे काम करून जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देणार की 20 वर्षांपासून अपयश झेलणाऱ्या नेत्याला मत देणार? असा प्रश्न उपस्थित करत येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपलाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाचव्यांदा बिहार दौऱ्यावर आले आहेत. गेल्या वषी सप्टेंबरमध्ये अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुऊवात मुस्लीमबहुल भाग असलेल्या किशनगंजमधून केली होती. जेडीयूचे खासदार असलेल्या सर्व जागांवर भाजपची नजर आहे.
जे. पी. न•ा राजस्थान दौऱ्यावर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस्थानमधील भरतपूर येथे पोहोचले. यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस हा आई, मुलगा आणि मुलगी यांचा पक्ष असल्याचे सांगून त्यांनी घराणेशाही वाढवली आहे. भाजपशिवाय असा कोणताही पक्ष नाही, ज्याने घराणेशाही पसरवली नाही. हा एकमेव पक्ष आहे, ज्यात भाजपचे कोणी राष्ट्रीय अध्यक्ष, कोणी प्रदेशाध्यक्ष तर कोणी सामान्य कुटुंबातून येऊन पंतप्रधान बनतात, असे त्यांनी स्पष्ट केले.









