पुणे / प्रतिनिधी :
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आदेश येईपर्यंत कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका, असे आदेश मनसचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 26 फेब्रुवारीला होत आहे. त्यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या समारोसमोर उभे आहेत. निवडणुकीमध्ये मनसे रिंगणात उतरलेली नाही. एखाद्या ठिकाणी विद्यमान आमदाराचे निधन झाले असेल, तर तिथली निवडणूक ही बिनविरोध करावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यानुसार मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. कसब्यामध्ये भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. तर, चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांच्यामध्ये थेट लढत आहे. त्यामुळे मनसेच्या कोणाला पाठिंबा देणार का, तटस्थ राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून








