जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये : अबकारी महसुलात 34 कोटीची वाढ,आयोध्येत राम निवासाठी प्रयत्न सुरू
पणजी : रोमी कोकणीचा विषय काढून विरोधक केवळ मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. रोमी कोकणीच्या विषयावर गोमंतकीय जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. कारण कोकणीला राजभाषेचा दर्जा आहे आणि मराठीचा वापर करण्याची मोकळीक आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण कऊ नको, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा सभागृहात केली. सभागृहात मंगळवारी अबकारी, व्यावसायिक शुल्क, राजभाषा खात्यांच्या मागण्यांवर विरोधकांनी विचारलेल्या प्रŽांवर मुख्यमंत्री बोलत होते. राजभाषा कायदा 1987 यावषी संमत झाला. रोमी कोकणीचा ठराव सभागृहात येतो आणि त्यानंतर त्याची आठवण कोणालाच राहत नाही. दाल्गाद कोकणी अकादमीला माझ्या कार्यकाळात पहिल्यांदाच अनुदान मिळालेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली. अयोध्येत गोव्याचे राम निवास होईल. राम निवासासाठी 4 हजार चौरस मीटर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. मुंबई गोवा भवनचे काम पूर्ण झाले असून, 8 ऑगस्टपासून बुकिंग सुरू होईल. दिल्लीत गोवा सदन इमारत मोडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच गोवा निवास इमारतीची दुऊस्तीही करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.
बनावट वॅट नोदणी प्रकरणी कारवाई सुरू
व्यावसायिक शुल्काचा महसूल वाढत आहे. मालमत्ता जप्त करून 20 कोटीची वसुली करण्यात आली आहे. बनावट वॅट नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांविऊद्ध मोहीम सुरू केली आहे. अबकारी खत्याचा महसूल 900 कोटींवर पोहचला असून, 34 कोटीची वाढ झालेली आहे. पेडणेच्या गैरव्यवहारात 27 लाख ऊपये वसूल केलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. पर्वरी येथे सरकारी कार्यालयांसाठी प्रशासन स्तंभ उभारण्याची चर्चा सुरू असून, त्यावर अजून निर्णय झालेला नाही. तसेच नव्या सरकारी निवासस्थानांचे (क्वाटर्स) बांधकाम सुरू करण्यात येईल, असे सरकारी इमारतींच्या प्रŽांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांकडून सभात्याग
मोपा विमानतळावर बिगर गोमंतकीय व्यक्तीने मद्यविक्रीचे दुकान सुरू केले आहे, असा आरोप करून हे मोपा विमानतळावरील मद्यविक्री दुकान ताबडतोब बंद करावे, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. त्यावर सभापती व मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, कार्लोस फेरेरा, वेन्झी व्हिएगस, वीरेश बोरकर यांनी सभापतींच्या हौद्यासमोर धाव घेतली. तरीही या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने विरोधकांनी सभात्याग करीत विधानसभेतून बाहेर पडले.
माझ्या कार्यकाळात शाळा परिसरात मद्यालयांना परवाने दिले नाहीत !
शिक्षण संस्थांच्या 100 मीटर परिसरात माझ्या सरकारच्या कार्यकाळात एकाही मद्य दुकानांना परवाना दिलेला नाही. खुरीस व घुमटीच्या परिसरात मात्र 10 ते 12 मद्य दुकानांना परवाने दिले गेले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले.









