पणजी : स्मार्ट सिटी कामांमुळे राजधानीत निर्माण झालेला गोंधळ किंवा पावसाळ्यात शहरात होणाऱ्या पूरस्थितीसाठी आम्हाला जबाबदार धरू नये. कारण ही कामे सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापौर, आमदार, आयुक्त किंवा स्मार्ट सिटीच्या अधिक्रायांनी माझ्यासह एकाही नगरसेवकाला विश्वासात घेतलेले नाही, असा दावा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केला आहे.गुरूवारी बाबूश मोन्सेरात यांनीही अशाच प्रकारे दावा करताना स्मार्ट सिटीच्या कामासाठी अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे म्हटले होते. आता त्याच धर्तीवर फुर्तादो यांनीही पत्रक जारी करून स्मार्ट सिटी कामांमुळे निर्माण झालेल्या गोंधळासाठी आपणास जबाबदार धरू नये. या कामांसाठी केवळ 28 नगरसेवकांनाच जबाबदार धरावे लागेल, असे म्हटले आहे. सध्या एक व्हीडिओ फिरत असून शहरातील नॅशनल थिएटर रोड जवळील गटार खराब झाल्याचे त्यात दिसत आहे. त्यातून पिण्याचे पाणी दूषित होत असून त्यामुळे टायफॉइड, कॉलरा आणि इतर आजार होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्याशिवाय पाण्याच्या पाईप लाईन आणि विद्युत केबल्स खोदताना पंक्चर झाले असून पावसाळ्यात पाणी केबल्समध्ये जाऊन शहरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होईल, असेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मात्र हे सर्व देवाच्या भरवशावर न सोडता त्यादृष्टीने वेळीच उपाययोजना कराव्या, असे फुर्तादो यांनी म्हटले आहे.
Previous Articleगुन्हे रोखण्यासाठी जनतेने सावध राहण्याची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









