प्रतिनिधी / बेळगाव
मराठी विद्यानिकेतनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले दत्तक योजनेंतर्गत शाळेचे हितचिंतक बेळगावचे उद्योजक शिवाजीराव विश्वासराव हंगिरकर यांनी 50 हजार ऊपये देणगी दिली. त्याचबरोबर शाळेची माजी विद्यार्थिनी सोनाली माने-कोंडूसकर यांनी 10 हजार ऊपये देणगी दिली. सोनाली माने सध्या बेंगळूर येथील आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
सामाजिक जाणिवेतून केलेल्या या मदतीबद्दल शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष अनंतराव जाधव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेचे संचालक किरण पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत उपस्थित होते.









