धामणे येथील मारुती मंदिर-महालक्ष्मी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे
वार्ताहर /धामणे
धामणे गावचे आराध्य दैवत श्री मारुती आणि ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी या दोन्ही मंदिरांचे जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ संघटनेने दोन लाख रुपयांची भरीव देणगी नुकतीच धामणे येथील देवस्थान पंचकमिटीकडे क्षेत्र धर्मस्थळ संघटनेचे धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांनी सुपूर्द केली. धामणे गावचे सुपूत्र सध्या गणेशपूर, बेळगाव येथे स्थायिक असलेले श्रीकांत शंकर धमनगी (धामणेकर) यांनी श्री मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी संपूर्ण फरशी दिली आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ आनंद धमनगी (धामणेकर) भारत लाईट हाऊस खडेबाजार, बेळगाव यांनी श्री महालक्ष्मी मंदिराचे आणि श्री मारुती मंदिराचे लाईट फिटींगचे संपूर्ण साहित्य दिले आहे. धामणे गावच्या देवस्थानच्या पुढाकाराने या दोन्ही मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे. नुकताच श्रीक्षेत्र धर्मस्थळ संघटनेचे अधिकारी विरेंद्र हेगडे व त्यांचे सहकारी अधिकारी आणि श्रीकांत धमनगी (धामणेकर) व विश्वनाथ धमनगी (धामणेकर) यांचा शाल, श्रीफळ देऊन देवस्थान पंचकमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. य् ााप्रसंगी देवस्थान पंच श्रीकांत डुकरे, महादेव चौगुले, विनोद अकणोजी, अशोक कामशेट्टी, पारीस शहापुरी, बाळू बेळगावकर, परशराम रेमाण्णाचे त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र धर्मस्थळ संघाच्या विभाग अधिकारी गंगा पाटील, गावसंघ सेवाधारी रेखा पाटील आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









