कोल्हापूर :
महाराष्ट्रासह देशभरात भाविकांनी गेल्या वर्षभरातील 8 महिन्यात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमध्ये सढळ हाताने आर्थिक स्वऊपात दान टाकत देवीवरील अपार श्रद्धा व्यक्त केली आहे. या दानमुळे पेट्या पैशांनी भरून जात होत्या. त्यामुळे प्रत्येक महिन्याला पेट्यांमध्ये दान स्वऊपात किती रक्कम साठली होती, त्याची त्याच महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन व्यवस्थापन समितीकडून मोजदाद केली जात होती. या मोजदादमधूनच देवस्थापन समितीला तब्बल 12 कोटी 76 लाख 5 हजार 338 ऊपये मिळाले आहेत. गेल्या महिन्याभरात 1 कोटी 98 लाख ऊपयांचे दान समितीला मिळून आले आहे. बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांकडून पेट्यांमधील पैशांची मोजदार करण्यात येत होती. त्यांना देवस्थान समितीच्या 30 ते 35 कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात दिला जात होता.
प्रत्येक महिन्यात अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमधील मिळाली रक्कम अशी
जानेवारी– 1 कोटी 90 लाख 99 हजार 186 रुपये
फेब्रुवारी– 97 लाख 21, हजार 828 रुपये
मार्च– 1 कोटी 33 लाख 43 हजार 670 रुपये
मे– 1 कोटी 98 लाख 8 हजार 290 रुपये
जुलै– 1 कोटी 58 लाख 92 हजार 701 रुपये
सप्टेंबर– 1 कोटी 84 लाख 4 हजार 70 रुपये
ऑक्टोंबर– 1 कोटी 14 लाख 43 हजार 210 रुपये
डिसेंबर– 1 कोटी 98 लाख 92 हजार 383 रुपये








