Donate the rest of the food grains from the Ganesh Jayanti festival to Samvita Ashram
ओटवणे येथील गणेश मंडळाचा आदर्श
ओटवणे कापईवाडी येथील गणेश मंदिरमधील माघी गणेश जयंती उत्सवातील उर्वरित अन्न धान्य पणदूर येथील संविता आश्रमाला दान करून गणेश मंदिर व्यवस्थापन समिती आणि श्री गणेश कला क्रीडा युवक मंडळाने एक वेगळा आदर्श मंडळांसमोर ठेवला आहे. यावेळी सविता आश्रमच्यावतीने या मंडळाचे आभार मानण्यात आले.
यावेळी तांदूळ १०० किलो, तूरडाळ १० किलो, वेलची १०० ग्राम, लवंग १०० ग्रॅम, साखर २५ किलो, रवा ५ किलो, मिरची २ किलो, टोमॅटो ५ किलो, नारळ ६५ नग, मिठ ३ किलो, मोहरी २०० ग्राम, कोथंबीर २ पेंडी आणि कपडे जिवनावश्यक वस्तू संविता आश्रमचे संदीप परब यांच्याकडे प्रदान करण्यात आले.
गेल्या वर्षीही या उत्सवातील उर्वरित सर्वांनी धान्य व इतर वस्तू या आश्रमाला देण्यात आल्या होत्या. यावेळी गणेश मंदिर व्यवस्थापन समिती आणि श्री गणेश कला क्रीडा युवक मंडळाचे प्रमोद केळुसकर, विश्राम केळुसकर, प्रकाश केळुसकर, स्वप्नील उपरकर, संतोष काटाळे, विकास रेडकर, संदेश गवळी, साई वरेकर, बाबल पंदारे, राजेश कर्पे आदी उपस्थित होते.
ओटवणे / प्रतिनिधी









