ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरूपीसाठी घालण्यात आलेली आता बंदी उठवण्यात येणार आहे. ट्वटिरचे मालक एलन मस्क यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन कॅपिटॉलवर उसळलेल्या दंगलीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घातली. त्यावेळी त्यांचे 88 मिलियन फॉलोअर्स होते. हिंसाचार आणखी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन तात्काळ प्रभावाने त्यांच्यावर कायमची बंदी घालण्यात आली होती.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी नुकतंच ट्वटिरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केलं आहे. फायनान्शयिल टाइम्स फ्युचर ऑफ द कार कॉन्फरन्समध्ये बोलताना एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरअकाऊंट रिस्टोर करणार असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्यावर ट्विटर बंदी नैतिकदृष्टय़ा वाईट निर्णय होता. हा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा होता. ट्विटद्वारे खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घालणे ही दुर्मिळ परिस्थिती असली पाहिजे तसेच जी खाती उपद्रवी आहेत, असे दिसतेय त्यांच्यावरच ही कारवाई केली जावी, असे मत त्यांनी मांडले.









