ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलशी संबंधित प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांना मॅनहॅटन कोर्टाने 1.22 लाख डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
2016 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला पैसे देणे तसेच दस्ताऐवजात बदल करण्यासह एकूण 34 आरोपांखाली ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ट्रम्प यांनी स्वत:ला मंगळवारी मध्यरात्री मॅनहॅटन कोर्टासमोर सरेंडर केलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. कोर्टाने त्यांना तब्बल 1 लाख 22 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात ट्रम्प यांनी आपण निर्दोष असल्याचे कोर्टाला सांगितले आहे. त्यांनी त्यांच्यावर असलेले सर्व 34 आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 डिसेंबर रोजी होणार आहे.
अधिक वाचा : आरटीईसाठी आज ऑनलाईन सोडत









