वृत्तसंस्था/ बेलग्रेड
ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमला येथे सुरू झालेल्या सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याला जॉन मिलमनने 6-3, 3-6, 6-4 असे हरविले.
माजी यूएस ओपन चॅम्पियन व माजी जागतिक तिसरा मानांकित थिएमला मागील वर्षी जूनमध्ये मार्बेला टेनिस स्पर्धेवेळी मनगटाची दुखापत झाली होती. त्यानंतर तो टेनिसपासून दूर राहिला होता. गेल्या महिन्यात स्पेनमधील याच शहरात त्याने पुनरागमन करताना चॅलेंजर क्ले कोर्ट स्पर्धेत भाग घेतला होता. पण तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला. त्यानंतर त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. तो सध्या 54 व्या स्थानापर्यंत घसरला आहे.









