ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. आता एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यासाठी प्रति सिलिंडर 750 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. 16 जूनपासून हा बदल लागू होणार आहे.
यापूर्वी एका सिलिंडरचे गॅस कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. आता त्यासाठी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दोन सिलिंडरच्या कनेक्शनसाठी 4400 रुपये द्यावे लागणार आहेत. आता नियामकासाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 150 रुपयांऐवजी 250 रुपये रेग्युलेटरसाठी खर्च करावे लागतील. पाईपसाठी 150, पासबुकसाठी 25 रुपये मोजावे लागतील. 5 किलोच्या सिलिंडरची सुरक्षा आता 800 ऐवजी 1150 करण्यात आली आहे.
या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर वाढवल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा जमा करावी लागेल.