आत्मनिर्भरतेच्या दिशेने वायुदलाचे मोठे उड्डाण
वृत्तसंस्था/ चंदीगड
भारतीय वायुदलाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक मोठी कामगिरी प्राप्त केली आहे. चंदीगड येथील 3 बेस रिपेयर डेपो(3 बीआरडी)मध्ये आता एमआय-17वी5 हेलिकॉप्टरसाठी वीके-2500-03 इंजिनची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. वायुदलाच्या स्वदेशी उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. . या ऐतिहासिक कामगिरीचा शुभारंभ वायुदल मेंटेनेंस कमांडचे प्रमुख एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी व्हर्च्युअली केला. यादरम्यान युनिव्हर्सल टेस्ट बेडचेही ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले, जे 3बीआरडीच्या इंजिन टेस्ट हाउसमध्ये स्थापित करण्यात आले आहे.
ही आधुनिक टेस्टिंग सुविधा वीके-2500-03 समवेत विविध इंजिन मॉडेलची तपासणी अन् प्रमाणनात मदत करणार आहे. एअर मार्शल गर्ग यांनी या कामगिरीला वायुदलाचा दृढसंकल्प, मेहनत आणि दूरदर्शितेचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. हे पाऊल वायुदलाच्या एअरोस्पेस उत्पादन आणि देखभालीत आत्मनिर्भर होण्याच्या लक्ष्याला मजबूत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वीके-2500-03 इंजिनचे उत्पादन भारत आणि रशियादरम्यान जेएससी रोसोबोरोनएक्सपोर्ट आणि भारतीय वायुदलाच्या ऑफसेट कराराचा हिस्सा आहे. चंदीगड येथील 3बीआरडीत या इंजिनची पहिली दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग देखील यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. हा स्वदेशी उत्पादनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण संकेत आहे.
एचएएलच्या मदतीने मिळाले यश
युनिव्हर्सल टेस्ट बेडला हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या एअरो इंजिन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरने विकसित केले आहे. वायुदलाला पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा टेस्ट बेड टीवी वी3-117एमटी, टीवी3-117व्हीएम, टीव्ही3-117व्ही आणि वीके-2500-03 इंजिनची तपासणी आणि प्रमाणनासाठी पूर्णपणे तयार आहे. ही कामगिरी भारतीय वायुदलाची तांत्रिक सक्षमता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.









