विदित, रिदिमा, विशाल, धीनिधी, शरन, अल्यासा यांना वैयक्तिक विजेतेपद

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एनआरजी केएलई युनिव्हर्सिटी व कर्नाटक जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनियर जलतरण स्पर्धेत सबज्युनियर गटात डॉल्फिन ऍक्वेटिक संघाने 206 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद तर 127 गुणांसह बसवणगुडी ऍक्वेटिक सेंटर संघाने उपविजेतेपद पटकाविले. ज्युनियर गटात बसवणगुडी ऍक्वेटिक संघाने 736 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद तर 720 गुणांसह डॉल्फिन ऍक्वेटिक संघाने उपविजेतेपद मिळविले.
जेएनएमसी ऑलिम्पिक लेव्हल जलतरण तलावात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनियर जलतरण स्पर्धेत शेवटच्या दिवशी सबज्युनियर गटात डॉल्फिन संघाने 206 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले तर 127 गुणांसह बसवणगुडी ऍक्वेटिक सेंटर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ज्युनियर गटात 736 गुणांसह बसवणगुडी ऍक्वेटिक सेंटर बेंगळूर संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले तर 720 गुणांसह डॉल्फिन ऍक्वेटिक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गट 1 मध्ये वैयक्तिक विजेतेपद विदित शंकरने (डॉल्फिन) 37 गुणासह तर मुलींच्या गटात रिदिमा विरेंद्रकुमारने (बसवणगुडी) 76 गुणासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. गट 2 मुलांमध्ये इशान मेहराने (डॉल्फिन) 45 गुणांसह तर मुलींमध्ये धीनिधी दिसिंगुने (डॉल्फिन) 85 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. गट 3 मुलांमध्ये शरन श्रीधराने (मेट्से) 45 गुणासह तर मुलींमध्ये अल्यासा स्विडल रेगोने (डॉल्फिन) 32 गुणासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., ब्रिगेडियर दयालन, केएलई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, गोपाळ होसूर, लता कित्तुर, माकी कपाडिया यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्यांना चषक, प्रमाणपत्र व पदके देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्विमर्स क्लब व ऍक्वेरिअस क्लब बेळगाव यांच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.









