विनापरवाना डिजिटल फलक लावणाऱ्या वर होणार कारवाई
ग्रामसभेत विविध विषयावर ठराव
सांगरुळ / वार्ताहर
डॉल्बी सिस्टीम व लेसर शो लावण्यास पूर्णपणे बंदी आणी ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे डिजिटल लावण्यास बंदी घालण्याचा तसेच मागील कालावधीतील कामांची चौकशी करण्याचा ठराव सांगरूळ (ता. करवीर) येथील ग्रामसभेत करण्यात आला.
सांगरूळ येथील महादेव मंदिर मध्ये झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शितल खाडे होत्या .यावेळी उपस्थित व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या चर्चेतून झालेल्या निर्णयानुसार गावात शंभर टक्के डॉल्बी व लेसर शो लावण्यास बंदी करणे आवश्यक ठिकाणी “शांतता प्रवण क्षेत्र” बोर्ड लावणेत यावेत. तसेच कोणत्याही प्रकारचे डीजीटल लावते वेळी ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी घेणेत यावी.बोर्ड लावणेसाठी ग्रामपंचायतीकडे रीतसर पावती करून बोर्ड लावणेसाठी ठराविक मुदत घालणेत यावी. एनर्जी ड्रिंक वरती बंदी घालणेत यावी. मागील कालावधीमध्ये थकीत वीज बिल का भरले नाही .फिल्टर हाऊस कामाची,कासोटे पाणंद पाईपलाईन कामाची व ग्रामपंचायत इमारत कलर कामाची चौकशी करणेत यावी.
मागील कालावधीमधील वीज बिल सोडून अन्य कोणत्याही प्रकारचे थकीत रक्कम देण्यात येवू नये. टेकाचा माळ येथील सांडपाणी प्रश्न मार्गी लावणेत यावा.कुंभार गल्ली येथे ३ फुटाची गटर्स करणेत यावी. सांगरूळ – खाटांगळे मेन रोडच्या दुतर्फा गटर्स बांधकाम करणेत यावे.गावातील नकाशावरती नोंद असलेल्या सर्व पानंदीचा प्रश्न निकाली काढणेत यावा .प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरूळ आवारातील उंच धोकादायक झाडे काढून घ्यावीत. ग्रा.प.हद्दीतील सर्व मिळकती नव्याने मोजून घेणेत याव्यात.
वॉटर मीटर फेर सर्व्हे करून खराब झालेली मीटर्स बदलून घ्यावीत व अडचणीच्या ठिकाणी जोडलेली मीटर्स व्यवस्थित जोडून घ्यावीत.इत्यादी ठराव करण्यात आलेत .वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरती पडलेली झाडे रात्रीच्या वेळी ग्रामपंचायतीने बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केलेबद्दल तसेच पाा चमहिन्यामध्ये चागल्या प्रकारे विकास कामे केलेबद्दल ग्रामपंचायतीचा अभिनंदन ठराव करण्यात आला .
पाण्याची टाकी येथील विद्युत मोटर साठी व ग्रामपंचायत कार्यालय साठी सोलर सिस्टीम बसविणेसाठी निधी दिल्याबद्दल खासदार संजयदादा मंडलिक व आमदार पी एन पाटील यांच्या अभिनंदनचा ठराव यावेळी करण्यात आला .स्वागत व प्रास्ताविक करून ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांनी विषय वाचन केले .
सरपंच शितल खाडे यांनी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सांगरूळच्या जनतेला सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही देऊन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या योजनांना सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी झालेल्या चर्चेत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे सरपंच शितल खाडे उपसरपंच सुभाष सुतार बदाम खाडे बाळासाहेब खाडे ( शिवारे ) सचिन लोंढे ग्रामसेवक अमोल काजवे , सचिन नाळे ,पोपट मंडगे, विवेक देसाई ,एम बी खाडे बाळासाहेब यादव, तौशिक मुल्ला ,विष्णूपंत गणपती खाडे रवींद्र खाडे, सुभाष नाळे यांनी सहभाग घेतला .यावेळी ग्रामपंचायत व सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .उपसरपंच सुभाष सुतार यांनी आभार मानले .









