ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मिरजमधील शासकीय रुग्णालयात खाटांवर चक्क कुत्रे झोपा काढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्सवर यासंदर्भातील फोटो शेअर करत आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कालच राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रात आरोग्यविभागाच्या योजनांची जाहिरात दिली होती. त्यावरुन रोहित पवार यांनी ही पोस्ट केली आहे. मिरज शासकीय रुग्णालयातील खाटांवर झोपलेल्या कुत्र्यांचा फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, एका कार्यकर्त्याने पाठवलेला मिरज शासकीय रुग्णालयाचा हा फोटो आहे. येथे कदाचित माणसांसोबत पाळीव प्राण्यांचा पण उपचार केला जात असावा. ही अभिनव योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असतील. या योजनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, शासनाने केवळ आरोग्यमंत्र्यांचे नामांकन करायला हवे.
https://x.com/RRPSpeaks/status/1705108061709533245?s=20
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत. पण माझ्या मतदारसंघात 40 टक्के काम पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसेच राज्यातल्या इतर भागात आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाकडे निधी नाही. अशा कारभाराला आता #THR_RISE_OF_HEALTHY_MAHARASHTRA म्हणायचे का? असा सवाल त्यांनी आरोग्यमंत्र्यांना केला.








