फिरण्यासाठी नेण्याचा मिळाला सल्ला
कोरोना महामारीमुळे जगभरात मोठे नुकसान झाले आहे. तेव्हापासूनच लोक आजारासोबत डिप्रेशनलाही बळी पडत आहेत. घरांमध्ये कैद राहिल्याने लोकांमध्ये नैराश्याची समस्या निर्माण झाली होती. अशा स्थितीत डॉक्टरांनी लोकांना हिंडण्या-फिरण्याचा सल्ला दिला होता. परंतु अलिकडेच ब्रिटनमधील डॉक्टरांनी माणसांप्रमाणेच श्वानांनाही हिंडण्यास नेण्याचा सल्ला दिला आहे, कारण तेथील श्वानांना डिप्रेशनची समस्या होत आहे.

ब्रिटनमध्ये श्वान देखील डिप्रेशनचे शिकार ठरत आहेत. अशा स्थितीत श्वानांना हिंडण्या-फिरण्यासाठी न्यावे असा सल्ला तज्ञ श्वानांच्या मालकांना देत आहेत. लियॉन टॉवर्स हे डॉग बिहेवियरिस्ट असून त्यांनी श्वानांना व्हेकेशनवर नेत स्वत:सोबत त्यांनाही आनंद मिळवून देण्याचे आवाहन श्वानमालकांना केले आहे.
सेन्सरी इनरिचमेंट हे श्वानांच्या आनंदाची चावी आहे, आमच्या देशातील 100 पैकी 99 श्वानांना पुरेशी मानसिक उत्तेजना मिळत नाही. जर तुमचा श्वान दिवसभर केवळ झोपून राहत असेल तर तो नैराश्याने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. याचमुळे श्वानांनाही व्हेकेशनवर नेण्याचा सल्ला दिला जात आहे. दैनंदिन दिनचर्येपासुन मुक्त करत श्वानांना नव्या दृश्यांनी युक्त असलेल्या वातावरणा नेल्यास त्यांना आवश्यक सेन्सरी इनरिचमेंट प्रदान करत असल्याचे टॉवर्स म्हणाले.

लियॉन टॉवर्स यांच्यानुसार श्वानांसाठी व्हेकेशनची सर्वात उत्तम क्रिया पोहणे आहे. समुद्रकिनारा श्वानांसाठी अत्यंत उत्तम आहे. तेथे वाळू अन् खाऱ्या पाण्यात चालल्याने त्यांना फायदा होईल, कारण ते स्वत:च्या पंज्याच्या माध्यमातून पोषक घटकांना शोषून घेतात. पोहण्याची क्रिया श्वानांना आवश्यक आरोग्यवर्धक घटक प्रदान करते. डॉग-फ्रेंडली बीच श्वानांना अत्यंत उत्तम अनुभव देखील प्रदान करतात. श्वान समुद्रकिनाऱ्यावर फिरल्याने 50 टक्के अधिक सक्रिय राहतात असे लियॉन यांचे सांगणे आहे.









