वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशात एका श्वानाच्या विरोधात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंद झाला आहे. यासंबंधीची तक्रार दसारी उदयश्री या महिलेने विजयवाडा पोलीस स्थानकात नोंदविली होती. श्वानाने मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहे. श्वानाला हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱया लोकांच्या विरोधातही कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. श्वानाकडून पोस्टर फाडले जाण्याच्या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
श्वानाने प्रथम भिंतीवर चिकटविलेल पोस्टर काढले आणि मग ते फाडल्याचे या व्हिडिओत दिसून येते. जगनमोहन रेड्डी यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, परंतु आंध्रप्रदेशात एक श्वान त्यांचा अपमान करत असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. श्वानाच्या विरोधातील ही तक्रार आता सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.









