Deepak Kesarkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वासाठी पक्ष सोडला असून उद्धव ठाकरेंना खोके- खोके म्हणुन चिडवण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असे राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. लोकांना खोक्यावरून चिडवल्याने किती घातक परिणाम होणार आहेत हे ठाकरेंना कळेल. अशा शब्दात केसरकारांनी ठाकरें गटावर टिका केली. ते आज कोल्हापूरात बोलत होते.
“लोकांना खोक्यांवरून चिडवणं हे किती घातक आहे आता उद्धव ठाकरे यांना कळाले असेल. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्वासाठी पक्ष सोडला, ते तत्त्वासाठी भांडत होते. आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर तुम्हीच निघून जा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं, त्यावेळी तुम्ही किती खोके दिले होते? उठाव केला त्याला तुम्ही गद्दार कसे काय म्हणता? संयमाला देखील अंत असतो, आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेऊन या सर्वांची हकीकत मांडणार आहे” असे ते म्हणाले.
कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जशी सामंज्याशी भूमिका घेतली आहे, तशी भूमिका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी अपेक्षा असल्याचे सांगितले आहे. तसेच दोन्ही राज्यांमधील संबंध बिघडतील अशी कोणतीही कारवाई करू नये याबद्दल आम्ही कर्नाटक राज्यपालांच्या कानावर गोष्ट घालू असे मंत्री म्हणाले.
संजय राऊत यांना कर्नाटक राज्याने समन्स काढल्याबद्दल बोलताना पालकमंत्री म्हणाले, “सीमावादावर बोलल्यामुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. राजकीय मतभेद असले तरी अशावेळी महाराष्ट्र म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जशी सामंज्याशी भूमिका घेतली, तशीच भूमिका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी आशा आहे.” असे ते म्हणाले.
राज्यपालाविऱोधात अधिक आक्रमक झालेल्या खासदार उदयनराजेंवर बोलताना पालक मंत्री म्हणाले,”छत्रपतींचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही. केंद्र सरकारने राज्यपालांना योग्य ते निर्देश दिले असतील, अशी आशा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भावना केंद्राकडे पोहोचवल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांबाबत योग्य तो निर्णय होईल असे मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. सावरकरांच्या बाबत वक्तव्य झाल्यानंतर आंदोलन सुरू होतं, मात्र त्या विषयाला बगल देण्यासाठी भाजपवर टीका केली जाते. असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








