सायकल, बाईक, कार, ट्रक आदी जमिनीवरुन धावणाऱ्या वाहनांना सुरक्षेचे एक साधन म्हणून भोंगा किंवा हॉर्न बसविलेला असतो, हे आपल्याला माहिती आहे. अपघात टाळण्यासाठी, किंवा अन्य वाहनांना अगर माणसांना सूचना देण्यासाठी तो असतो. तथापि, विमान या आकाशातून प्रवास करणाऱ्या वाहनालाही हॉर्न असतो का, आणि असला तर त्याचा उपयोग नेमका काय असतो, असे प्रश्न आपल्याला आश्चर्यकारक वाटतील. कारण विमानाला हॉर्नचा उपयोग काय, तसेच हॉन वाजविला तरी ते आकाशात थांबवता थोडेच येते ? अशाही शंका आपल्या मनात आल्यावाचून राहणार नाहीत. तथापि, विमानालाही हॉर्न असतो.
तर विमानाला भोंगा का बसविलेला असतो, या प्रश्नाचे उत्तर तज्ञांनी दिले आहे. विमान त्याचा बव्हंशी प्रवास आकाशात करते आणि आकाशात भोंग्याचा काहीच उपयोग नसतो, हे खरे आहे. तथापि, विमान काही कायमचे आकाशात असत नाही. त्याला जमिनीवर (म्हणजेच विमानतळावर) उतरावे लागतेच. शिवाय त्याचे आकाशात उ•ाणही जमीनीवरुनच होते. जमिनीवर विमानाला काही प्रवास करावा लागतो. विमानतळावर एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी जाण्यासाठी विमानाला कारप्रमाणे आपल्या चाकांवर प्रवास करावा लागतो. अशावेळी हॉर्नचा उपयोग करण्याची आवश्यकता भासू शकते. म्हणून विमानालाही हॉर्न असतोच.
आकाशातून विमान जेव्हा धावपट्टीवर उतरते, तेव्हा प्रामुख्याने विमानाचा हॉर्न वाजविला जातो. विमान उतरताना वैमानिकाला ग्राऊंड इंजिनियरशी संपर्क करावा लागतो. तसेच विमान उतरत असल्याची सूचना भूमीवरच्या अन्य कर्मचारीवर्गाला द्यावी लागते. त्यासाठी वैमानिक विमान धावपट्टीच्या जवळ पोहचले की भोंगा वाजवून त्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेता. अशा प्रकारे विमानाच्या हॉर्नचा उपयोग केला जातो. विमानालाही हॉर्नची आवश्यकता अशाप्रकारे भासतेच.









