आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ भेट
दोडामार्ग – वार्ताहर
भाजपचे नेते तथा कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ येथील सावंतवाडा मधील जि. प. प्राथमिक शाळेला भेट स्वरूपात प्रिंटर देण्यात आला. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आपल्या स्वखर्चातुन हा प्रिंटर दिला.शहरातील सावंतवाडा येथील या प्रशालेत अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी शिकत आहेत. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीही चांगल्यातले चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांपैकी ही एक शाळा असून अनेक स्तुत्य उपक्रम तसेच कार्यक्रम शाळेमार्फत राबविले जातात. अलीकडेच प्रशालेतील संगणकाचा प्रिंटर नादुरूस्त झाला होता. ही बाब शिक्षक पालक संघाच्या वतीने श्री. नानचे यांच्या कानावर घातली. तेव्हा नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संतोष नानचे यांनी अत्याधुनिक स्वरूपातील हा प्रिंटर दिला. प्रशालेला प्रिंटर मुख्याध्यापक तेजा ताटे, सहाय्यक शिक्षक अमित पाटील, प्रशांत निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द करताना भाजप शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर, सुनील म्हावळणकर, प्रकाश काळबेकर, केशव रेडकर, साईनाथ कुंदेकर, सागर म्हावळणकर, एवियासन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रीतम कुमार, अनिल वर्मा आदी उपस्थित होते.