दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष पदी दोडामार्ग शहरामधील सावंतवाडा येथील सौ. श्रेजल सागर नाईक यांची निवड करण्यात आली. तर महिला उपतालुकाध्यक्ष पदी कोलझर येथील प्रिया देसाई यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही सौ. नाईक व सौ. देसाई यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे – परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहरअध्यक्ष – सुदेश तुळसकर, ओबीसी सेल अध्यक्ष उल्हास नाईक, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. संदीप गवस यांसह आनंद तुळसकर, गौतम महाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादीचे काम आणि अनेक महिलांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सौ. नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.









