प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : ज्या समाजात शिक्षणाचा फारसा वारसा नव्हता आणि परंपरांनी त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता अशा काळात महाराष्ट्रात कोल्हापूर विद्येचे माहेरघर झाले. कोल्हापूर आणि या माहेरघराचा पाया राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घातला. त्यांनी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन राज्यकारभार केला, असे प्रतिपादन येथील पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भाने ऐतिहासिक माहितीपट कार्यशाळेत ते प्रमुख उदघाटक म्हणून बोलत होते.
शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने ऐतिहासिक माहितीपट निर्मिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 आणि 11 एप्रिल या दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे उदघाटन गणेशकुमार खोडके आणि निवेदक विक्रम रेपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
समाजाच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असणारा राजा:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज या विषयावर बोलताना खोडके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राज्यकारभार केला. कोल्हापूर संस्थानात 1902 मध्ये पाहिल्यांदा आरक्षणाचा जाहिरानामा काढला.शाहू महाराजांनी कोल्हापुरात विद्येच्या माहेरघराचा पाया घातला आणि 1917 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यातून बहुजनांच्या पिढ्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. समृद्ध आणि विकसित झाल्या. विक्रम रेपे यांनी माहितीपट कसे बनवावेत? याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले.
दरम्यान आज मंगळवारी (दि. 11 ) शाहू महाराज संदर्भ साहित्य या विषयावर डॉ. निलांबरी जगताप आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कार्यक्रमाची रूपरेषा या विषयावर माहिती अधिकारी वृषाली पाटील मार्गदर्शन करणार आहेत. प्रास्ताविक आणि स्वागत विभाग प्रमुख डॉ. निशा मुढे-पवार यांनी केले. आभार प्रा. परशुराम पवार यांनी मानले. यावेळी प्रा. सुमेधा साळुखे आणि विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









