राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून नियम जारी : औषध कंपन्यांकडून भेटवस्तू घेण्यास डॉक्टरांना मनाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डॉक्टरांवर हल्ला करण्याच्या किंवा त्यांच्याशी हुज्जत घालण्याच्या घटना अनेकदा समोर येतात. कधी रुग्णाकडून तर कधी रुग्णाच्या नातेवाईक किंवा कुटुंबीयांकडून अशा गैरप्रकारांच्या घटना घडत असतात. अशाप्रसंगी डॉक्टरांकडे उपचाराशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डॉक्टर अशा ‘हिंसक’ ऊग्णांवर उपचार करण्यास नकार देऊ शकतात. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नवे नियम जारी केले असून त्यांच्याआधारे डॉक्टर उपचार करण्यास नकार देऊ शकणार आहेत. तसेच डॉक्टर ऊग्णांच्या असभ्य वर्तनाविरोधात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार करू शकतात.
डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ऊग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून गैरवर्तन, हिंसा किंवा अपमानास्पद वागणूक मिळाल्यास आता डॉक्टर परिस्थितीनुरूप उपचारांना नकार देऊ शकतात. नॅशनल मेडिकल कमिशन रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरने (आरएमपी) 2023 च्या अधिकृत अधिसूचनेत यासंबंधी काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. संबंधित ऊग्णांना उपचारासाठी अन्यत्र रेफर करावे, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
जीवरक्षक आणीबाणी व्यतिरिक्त आता कोणावर उपचार करावे आणि कोणाला करू नयेत हे निवडण्याचे अधिकार ‘आरएमपी’ला देण्यात आले आहेत. मात्र, केस हाती घेतल्यानंतर ‘आरएमपी’ने त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि कुटुंबाला यासंबंधी रितसर माहिती न देता त्यातून स्वत:ला वेगळे करू नये, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच डॉक्टर कोणत्याही औषध कंपनीकडून भेटवस्तू, प्रवासी सेवा आदी घेऊ शकत नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे. उपचारापूर्वी ऊग्णांना सल्ला शुल्क आणि इतर शुल्काची संपूर्ण माहिती द्यावी, असे या नियमावलीत म्हटले आहे. हे नियम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मेडिकल एथिक्स कोड 2002 ची जागा घेतील. त्यानुसार ऊग्णांना उपचार नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना प्रथमच मिळणार आहे.









