रुग्णांना लवकरच बरे करण्याचा सिक्रेट फॉर्म्युला
जेव्हा एखादा रुग्ण उपचाराला प्रतिसाद द्यायचा थांबल्यावर डॉक्र त्याच्या कुटुंबीयांना प्रार्थना करण्याचा सल्ला देतात. चमत्कार केवळ ईश्वरच करू शकतो असे अनेक लोकांचे मानणे आहे. अशा स्थितीत रुग्णालयांमधील डॉक्टर स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक विश्वास देवावर ठेवून शस्त्रक्रिया सुरू करत असल्यास ऐकणाऱयाला काहीसे अजब वाटते. परंतु युरोपीय देश स्वीत्झर्लंडमध्ये आज देखील असेच घडते.
स्वीत्झर्लंडच्या अनेक रुग्णालयांमध्ये आज देखील डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी देवाकडे एक विशेष प्रार्थना करतात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि शस्त्रक्रियेत अधिक रक्तस्राव होत नसल्याचे मानले जाते. स्वीत्झर्लंडमध्ये हा हीलिंग फॉर्म्युला मध्यकाळापासून चालत आला आहे. आजही अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर प्रार्थना केल्यावरच शस्त्रक्रियेला सुरुवात करतात.

या प्राचीन फॉर्म्युलावरुन अनेक संशोधने करण्यात आली आहेत. हे मेडिसीनचे मॅजिकल कंसेप्शन असून त्याला सिक्रेट म्हटले जाते. मध्यकाळात औषधे आणि हीलिंगचे काम मोंक करायचे, अशा स्थितीत रुग्ण बरा झाल्यास ते चमत्कार मानायचे. या फॉर्म्युल्यावर संशोधन करण्यात आले असता 76 टक्के लोक प्रार्थनेमुळे कमी रक्तस्राव झाल्याचे मानत असल्याचे दिसून आले. अनेक लोकांनी शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांना प्रार्थना करण्याची विनंती केली. यावर ब्लीडिंग अकॅडेमिक रिसर्च कन्सोर्टियमच्या संशोधनानंतर प्रार्थना केलेल्या शस्त्रक्रियेपैकी 72 टक्के रुग्णांमध्ये रक्तस्राव झालेला नाही. तर ऍडव्हान्स मेडिकल प्रोसिजरयुक्त रुग्णांपैकी 73 टक्के रुग्णांमध्ये रक्तस्राव झालेला नाही.
लोकांचा प्रार्थनेवर विश्वास
या प्रार्थनेला स्वीत्झर्लंडमध्ये ‘द सिक्रेट’ म्हणून ओळखले जाते. याला युनेस्कोकडून वारसा म्हणून स्वीकारण्यात आले आहे. परंतु या प्रार्थनेला रक्तस्राव किंवा कुठल्याही आजारावर कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडत नाही, परंतु लोक यावर श्रद्धेपोटी विश्वास ठेवतात. जुन्या काळात लोकांना तणावापासून दूर करण्यासाठी ही प्रार्थना म्हटली जात असावी असे मानले जाते.









