रत्नागिरी :
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे कार उलटून पेटल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडल़ी याठिकाणी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण कऊन कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आल़ी या अपघातात कारमधील दोघांपैकी दहा वर्षीय बालिका किरकोळ जखमी झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबर रोजी डॉ. मिहीर मुरलीधर प्रभुदेसाई (40, कोलगाव -सावंतवाडी) व मुलगी श़्रीशा मिहीर प्रभुदेसाई (10) हे दोघेजण कोलगाव येथून कार (एमएच 07 क्यु 8032) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही कार हातखंबा येथे आली असता चालक डॉ. प्रभुदेसाई यांना दिशादर्शक फलक नीट न समजल्याने कार एका कठड्याला ठोकरल़ी यानंतर रस्त्याच्या कडेला कार उलटली आणि कारमधून धूर येऊ लागला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभाग पोलिसानी तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन कारमधील डॉ. प्रभुदेसाई आणि त्यांच्या मुलीला बाहेर काढले. गाडी उलटल्याने श्रीशा हिला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आह़े








