बेळगाव – येथील प्रसिद्ध क्लासवन कॉन्ट्रॅक्टर सुनील गुरव यांचे चिरंजीव रोहन सुनील कुमार गुरव यांना विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील डॉक्टरेट पदवी आज कर्नाटकचे राज्यपाल तेवरचंद्र गेहलोत आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
यावेळी विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या पदवीदान समारंभात ही डॉक्टरेट पदवी रोहन गुरव यांना देण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विद्याशंकर उपस्थित होते. रोहन गुरव यांनी दूध डेअरी क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या वेस्ट वॉटरचा उपयोग काँक्रीट मध्ये कसा करता येईल, यासंबंधी संशोधन केलेले आहे आणि हा विषय विद्यापीठाने स्वीकारून त्यांना ही डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. रोहन गुरव यांना डॉक्टर के बी प्रकाश यांचे मार्गदर्शन ही पदवी मिळविताना झालेले आहे
रोहन गुरव यांचे शिक्षण टिळकवाडी हायस्कूल येथे मराठी माध्यमातून झालेले होते. त्यानंतर जीएसएस कॉलेज व त्यानंतर गोमटेश पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा आणि नंतर केलेली इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग मधील बी पदवी संपादन केली तसेच केली मधूनच त्यांनी एम टेक पदवी पर्यावरण क्षेत्रातील पदवी मिळविली मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन त्यांनी हा यश मिळवले आहे हे वैशिष्ट्य आहे सध्या ते विश्वेश्वरय्या विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करीत आहेत.









