कोल्हापूरः
चारचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट मेडिकल मध्ये घुसली. चारचाकी एक डॉक्टर चालवत होता. शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे ही घटना घडली. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मेडिकल स्टोअरसह मोटारसायकलचे अपघातात मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने गाडीची मोडतोड करत डॉक्टरचीही धुलाई केली.









