पुलाची शिरोली प्रतिनिधी
संतोष जगन्नाथ ढोले (वय वर्ष ४१, रा. धुळगाव तालुका कवठेमहंकाळ जिल्हा सांगली) या डॉक्टरने मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथे गायरान जागेतील झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची फिर्याद मौजे वडगावचे पोलीस पाटील अमिर हजारी यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
संतोष ढोले हे डॉक्टर व्यावसायिक असून त्यांचा इस्लामपूर तालुका वाळवा येथे धन्वंतरी हेल्थ केअर सेंटर या नावाने दवाखाना आहे. पण त्यांनी मौजे वडगाव येथे येऊन आत्महत्या करण्याचे कारण काय? किंवा त्यांचा कोणीतरी घातपात केला असावा? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेची नोंद शिरोली एम आयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून स. पो. निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.









