अनेकांचे केस लवकर गुंता होतात. थोडासा जरी कंगवा फिरवला तरी केस लगेच गळायला लागतात. जर तुम्हाला हा गुंता जास्त होऊ द्यायचा नसेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
केस धुतल्यानंतर बहुतेक लोकांचे केस गुंता होतात. अशा वेळी केस धुण्यापूर्वी तेलाने चांगले मसाज करा.
केस धुतल्यानांतर कधीही ओले केस विंचरू नका .
केसांवर हीटिंग प्रॉडक्टचा वापर कमी करा.
केस ड्राय असल्यामुळे ते अधिकच गुंततात. अशा वेळी हेअर मास्क लावणे खूप गरजेचे आहे. तुम्ही घरी दही-मध हेअर मास्क वापरू शकता. हेअर मास्क केसांना मऊ आणि मजबूत बनवू शकतात.
केस धुतल्यानंतर तुम्ही कंडिशनर वापरणे आवश्यक आहे.
केस थोडेसे सुकल्यानंतर सिरम लावा.
Previous Articleअसा बनवा जेवणाची लज्जत वाढवणारा भाजी मसाला
Next Article पुण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा









