पुलाची शिरोली प्रतिनिधी
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रामाणिक राहून काम केल्यास आपले ध्येय निश्चित साध्य होते. असे मत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निकम यांनी व्यक्त केले ते पुलाची शिरोलीतील कौतुक विद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त शास्त्रज्ञ बी.एच पाटील हे प्रमुख उपस्थित होते .
श्री निकम पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आहोत याचे भान ठेवून काम केल्यास व प्रामाणिक राहिल्यास ध्येय निश्चित यशस्वीपणे गाठता येते .तसेच विद्यार्थ्यांनी आदर्श पाल्य, आदर्श विद्यार्थी व देशाचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा .असे आवाहन निकम यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना श्री निकम यांनी आपला संपूर्ण जीवनपट अतिशय समर्पकतेने सांगितला.
या कार्यक्रमास वारणा बँकेचे माजी संचालक अरविंद पवार ,लक्ष्मण कदम, शंकर उन्हाळे, वहिदा पटेल, माजी उपसरपंच उदय पाटील, मुकुंद नाळे डॉ. बाजीराव पाटील ,डॉ. ओंकार पाटील, डॉ. वसंत शिंदे, विश्वास पवार आदी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ योगिता लंबे यांनी केले,आभार बी.बी. मुल्ला यांनी मानले.









