सणासुदीच्या दिवशी घरातील महिला कामामध्ये खूप व्यस्त असतात.पण सणामध्ये आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकीला वाटत असतं. पण पार्लर मध्ये जाणं प्रत्येकीलाच शक्य होत नाही. मेकअपच्या काही सोप्या टीप्स अशावेळी नक्कीच उपयोगी ठरतात. आज आपण जाणून घेऊयात घरच्या घरी झटपट मेकअप कसा करता येईल.ज्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्हालाही छान तयार होता येईल.
चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर सर्वात पहिले मॉईस्चराईजर लावा. त्यानंतर तुमच्या स्किन टोनला मॅच असणारे फाऊंडेशन लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर त्वरीत उजळपणा दिसून येईल. फाऊंडेशन लावायला वेळ नसेल तर चेहऱ्याला प्राईमर लावायला मात्र विसरू नका.
मेकअप मध्ये डोळ्यांचा भाग जास्त हायलाईट करणं गरजेचे आहे. तुम्ही डोळ्यांना पटकन स्मोकी आय लुक देऊ शकता अथवा डोळ्यांना थोडं जाडे आयलायनर लाऊन काजळ लावा.
यानंतर ओठांना गडद रंगांची लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावल्याने तुमचा मेकअप पूर्ण होईल.
तुमच्या गालावर थोड्या प्रमाणात लिपस्टिक लावा आणि ते चांगले ब्लेंड करा. यासाठी तुम्हाला जास्त लिपस्टिक वापरण्याची गरज नाही.
यानंतर डोळ्यांना मस्कारा लावा. यामुळे तुमच्या पापण्या जाड दिसतील. यामुळे तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. याने तुमचा मेकअप पूर्ण होतो.
वरील टिप्स वापरून तुम्ही कधीही पटकन तयार होऊ शकता. शिवाय हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिट्सपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









