जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांना सूचना, कारवाईचा इशारा
बेळगाव : निवडणूक प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करू नये, याबरोबरच कोणत्याही धार्मिक ठिकाणी उमेदवारांनी प्रचार करू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. य् ाासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून मंदिर, चर्च, मशीद आदी धार्मिक ठिकाणांवर निवडणूक प्रचार केला जात असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. कागवाड व कुडची मतदारसंघात आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंबंधी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना सूचना केली आहे. य् ााबरोबरच वेगवेगळ्या मतदारसंघांतील निवडणूक अधिकारी व एफएसटी पथकांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची सूचना केली असून कोणत्याही प्रकारचे निवडणूक गैरप्रकार दिसून आल्यास कारवाई करण्याची सूचना केली आहे. नागरिकांनीही अशा गैरप्रकारांबद्दल फोटो, व्हिडिओसह निवडणूक विभागाच्या अॅपच्या माध्यमातून तक्रार करावी किंवा माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. निवडणूक प्रचारासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणे आणि धार्मिक ठिकाणांवर प्रचार करण्याच्या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनीही दिला आहे. कागवाड व कुडची मतदारसंघात घडलेल्या प्रकारानंतर सर्वत्र लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.









