मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून 4 उमेदवारांची नावे जाहीर
वृत्तसंस्था/ चेन्नाई
तामिळनाडूत द्रमुकने राज्यसभा निवडणुकीसाठी बुधवारी चार उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत द्रमुकचे तीन आणि मक्कल निधी मय्यम (एमएनएम) मधील अभिनेता-राजकारणी कमल हासन यांचा समावेश आहे. द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी उमेदवारांची घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला आधीच ठरलेला असल्याचे स्पष्ट केले. द्रमुकने विद्यमान खासदार पी विल्सन, माजी आमदार एस. आर. शिवलिंग आणि पक्षाचे प्रवक्ते रुकैया मलिक यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून निवडले आहे.









