वृत्तसंस्था/चेन्नई
मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हासन लवकरच राज्यसभेचे खासदार होणार आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघमने (द्रमुक) आपल्या कोट्यातून त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कमल हासन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत अभिनंदन केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक आणि एमएनएममध्ये एक करार झाला होता. ज्याअंतर्गत द्रमुकला राज्यसभेत एक जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कमल हासन यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नाही. परंतु तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता.









