राज्यपालांना बरखास्त करण्याची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तामिळनाडूतील द्रमुकच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीच्या खासदारांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन सोपवून राज्यपाल आर.एन. रवि यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. देशद्रोही अन् सांप्रदायिक वक्तव्ये तसेच स्वतःचे कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत द्रमुकने राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. तामिळनाडूतील सत्तारुढ आघाडीचा विविध मुद्दय़ांवरून राज्यपालांशी संघर्ष सुरू आहे. प्रलंबित नीट विधेयकाचा यात समावेश आहे. राज्यपालांवर सार्वजनिक स्वरुपात धोकादायक, धार्मिक वक्तव्ये करण्याचा आरोप सत्तारुढ आघाडीने केला आहे.









