चेन्नई
तामिळनाडूत द्रमुकच्या एका नेत्याने एका इसमाला कारने चिरडले आहे. याप्रकरणी द्रमुक नेता विनयगम पलानिस्वामीला अटक करण्यात आली आहे. विनयगम हा तिरुपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. तर मृताचे नाव देखील पलानिस्वामी असून त्यांनी द्रमुक नेत्याच्या विरोधात तक्रार केली होती. द्रमुक नेत्याने तक्रारदार दुचाकीवरून जात असताना त्याला स्वत:च्या कारने मागून ठोकरले होते. तामिळनाडूत मागील काही काळापासून कायदा-सुव्यवस्था खालावल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.









