वाढीसोबत नफा 623 कोटीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी डीएलएफने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2023-24 ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 31 टक्क्यांनी वाढून 622.78 कोटी रुपये झाला आहे. डीएलएफने आपल्या बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 477.04 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
महसुलात 3.5 टक्क्यांनी वाढ
जुलै-सप्टेंबर तिमाहीत रिअल इस्टेट सेक्टर कंपनीचे एकूण महसूल वाढून रु. 1,476.42 कोटी इतका झाला आहे मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने रु. 1,360.30 कोटी महसूल प्राप्त केला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत किंवा पहिल्या सहामाहीत डीएलएफचे एकूण उत्पन्न वाढून 2,998.13 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 2,876.78 कोटी रुपये होते. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीने 1149 कोटी रुपयांचा एकूण नफा पदरात पाडून घेण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षी 946 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. समभाग शेअरबाजारात 4 टक्के वधारला होता. घर विक्रीतून 2228 कोटी रुपये प्राप्त केले आहेत.









