मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीएलएफने आपल्या चौथ्या तिमाहीत 569 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता हा नफा 40 टक्के अधिक आहे. घरांच्या मागणीत सदरच्या तिमाहीत झालेल्या वाढीचा परिणाम नफ्यात वाढीस कारणीभूत ठरला. या तिमाहीत नव्या घर बुकिंगमधून कंपनीने 8458 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. चौथ्या तिमाहीत कंपनीने 1576 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षात 6012 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केलाय.








