नवी दिल्ली :
डीएलएफ ही बांधकाम व्यावसायिक कंपनी गुरुग्राममध्ये गृहबांधणी प्रकल्प राबवणार आहे, ज्याकरीता कंपनीने 5500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या आर्थिक वर्षात विक्री बुकिंगमध्ये विक्रम करण्यासाठी कंपनी प्रयत्नात आहे.
जवळपास 18 एकरच्या क्षेत्रफळात कंपनी डीएलएफ प्रिव्हाना नॉर्थ हा गुरुग्राममध्ये प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पात 1150 इतके फ्लॅटस् असतील. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी अंदाजे 5500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मागच्या वर्षी प्रिव्हाना दक्षिण व पश्चिम असे दोन प्रकल्प उभारले होते. मे 2024 मध्ये डीएलएफने याच प्रकल्पातील टप्प्यातून 795 अपार्टमेंट विक्रीतून 5590 कोटी रुपये केवळ तीन दिवसात मिळवले आहेत.









