कर्नाटक निवडणुकांच्या निकालानंतर कॉग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची युती होणार या अटकळीला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी छेद दिला आहे. जडीएस शी कोणतीही युती नाही. राज्यात आम्ही स्वबळावर सरकार बनवू अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी आज 10 मेला झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेस आणि जेडीएसचा निकालानंतरच्या युतीच्या चर्चा फेटाळताना म्हणाले “काँग्रेस, जेडीएस 2018ची निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आले होते. परंतु काही बंडखोर आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने या युतीचे सरकार कोसळले. यावर्षी जेडीएस पक्षाशी युतीची कोणतीही शक्यता नाही. आम्ही स्वबळावर सरकार स्थापन करू.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “महागाई, भ्रष्टाचार, सुशासन आणि विकास हे प्रमुख मुद्दे या निवडणुकीत असून मी सर्वांना आवाहन करतो कि कृपया आपले गॅस सिलिंडर पाहूनच मतदान करा. मी माझ्या सर्व नेत्यांना सिलेंडरवर हार घालून मतदान करण्याचा सल्ला दिला आहे.” असे ते म्हणाले.









