वृत्तसंस्था/कॅलिफोर्निया
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या 20 वर्षीय लुका नार्डीने सर्बियाच्या टॉपसिडेड नोव्हॅक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का दिला.
या स्पर्धेतील झालेल्या एकेरीच्या सामन्यात नार्डीने जोकोव्हिचचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव केला. एटीपीच्या मानांकनात 123 व्या स्थानावर असलेल्या नार्डीने जोकोव्हिचची गेल्या 11 सामन्यातील विजयी घोडदौड खंडित केली.
अन्य ठिकाणी सुरू असलेल्या स्पर्धांमध्ये रूमानियाच्या सातव्या मानांकीत रूनेने मुसेटीचा, रशियाच्या मेदव्हेदेवने सेबेस्टीयन कोर्दाचा पराभव केला. नॉर्वेच्या कास्पर रूड आणि मोनफिल्स यांनीही आपले विजय नोंदवित पुढील फेरी गाठली. महिलांच्या विभागात साबालेंका आणि कोको गॉफ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. मात्र जपानच्या ओसाकाला मर्टेन्सकडून हार पत्करावी लागली.









