वृत्तसंस्था/ पॅरिस
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने टेनिसमधील एकेरीचे सुवर्णपदक पटकावले. चुरशीच्या अंतिम लढतीत त्याने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा पराभव केला. इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीके कांस्यपदक पटकावले.
जोकोविचने अल्कारेझवर 7-6 (7-3), 7-6 (7-2) अशी मात करून पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले. याशिवाय एकेरीचे जेतेपद पटकावणारा तो 1988 नंतरचा सर्वात वयस्कर खेळाडूही बनला आहे. तो सध्या 37 वर्षाचा आहे. त्याने चारही ग्रँडस्लॅम व ऑलिम्पिक सुवर्ण असे गोल्डन स्लॅम पटकावत आंद्रे अॅगास्सी, राफेल नदाल, स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम्स यांच्या पंक्तीत स्थान मिळविले.









