वृत्तसंस्था/ बोस्निया
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या श्रीपेस्का खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचचे आव्हान त्याच्याच देशाच्या लेझोविककडून उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या ड्युसेन लेझोविकने जोकोविचचा 6-4, 7-6(8-6) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. जोकोविचला त्याच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 11 वर्षानंतर पहिल्यांदाच सर्बियन खेळाडूकडून हार पत्करावी लागली आहे.









