वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविचने पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठताना हुरकेझचा पराभव केला. 2023 च्या टेनिस हंगामातील जोकोविचचा हा सलग पंधरावा विजय आहे.
आतापर्यंत पाचवेळा ही स्पर्धा जिंकणाऱया जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हुरकेझवर 6-3, 7-5 अशी मात केली. गेल्या वषी एटीपीची शेवटची फायनल्स स्पर्धा जोकोविचने जिंकली होती.









