वृत्तसंस्था/ टोरँटो
येथे 3 ते 13 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या टोरँटो खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हॉक जोकोविचने विश्रांतीच्या समस्येवरुन माघार घेतली आहे.
अलिकडेच लंडनमध्ये झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनच्या नवोदित अल्कारेझने जोकोविचचा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत पहिल्यांदा जेतेपद मिळविले होते. या स्पर्धेनंतर 36 वर्षीय जोकोविचला जादा थकवा जाणवत आहे. तथापि, काही दिवस आपण विश्रांती घेणार असल्याने टोरँटो स्पर्धेतून माघार घेतल्याचे जोकोविचने स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. टोरँटोतील नॅशनल बँक खुली ही स्पर्धा जोकोविचने यापूर्वी चार वेळेला जिंकली आहे.