वृत्तसंस्था/ अॅथेन्स (ग्रीस)
ट्युरीनमध्ये होणाऱ्या आगामी 2025 च्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतून सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविचने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अलिकडेच झालेल्या अॅथेन्स खुल्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या जोकोविचने मुसेटीचा सरळ पराभव करत विजेतेपद मिळविले होते.
दरम्यान ट्युरीनमध्ये होणाऱ्या एटीपी फायनल्स स्पर्धेत आपण दुखापतीमुळे उपस्थित राहू शकणार नसल्याचे जोकोविचने स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. अॅथेन्सची स्पर्धा जिंकून जोकोविचने एटीपी टूरवरील स्पर्धेतील 101 वे जेतेपद मिळविले आहे. त्याने अॅथेन्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुसेटीचा 4-6, 6-3, 7-5 असा फडशा पाडला









